Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

बिल भरणारा सेक्रेटरी


ऑनलाईन बँकिंगने आपल्या रोजच्या व्यवहारांचे चित्रच पालटून टाकले आहे. ऑनलाईन बँकिंगमध्ये आपल्याला ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा व विविध ऑनलाईन व्यवहारांसाठीची सुविधा उपलब्ध होते. आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये आपल्याला अनेक गोष्टींचे पैसे, शुल्क, बिल्स भरायची असतात. यात आपले वीजेचे बिल, फोन व हल्ली मोबाईलचे बिल, विम्याच्या पॉलिसीचे नूतनीकरण, इत्यादी असते.

अगदी काही वर्षांपूर्वी ही सारी बिलं आपण मोठ-मोठ्या रांगा लावून भरत होतो. त्यात समजा आपल्या कामाच्या व्यापामुळे किंवा नोकरी/व्यवसायांमधील दौर्‍यांमुळे एखाद्या महिन्याचं बिल भरण्याचा जर आपल्याला विसर पडला तर मग आपल्याला मिळणार्‍या सुविधेत खंड पडण्याच्या गैरसोयीला व मन:स्तापाला सामोरं जावं लागते. पण या ऑनलाईन बँकिंगमुळे हा वेळकाढू प्रकार करण्याची गरज आज आपल्यासाठी उरलेली नाही.

बिलांबरोबरच जवळ-जवळ सर्वच सेवादाते व उत्पादनकर्ते-विक्रेत्यांनीदेखील त्यांचे शुल्क किंमत ऑनलाईनच ‘पेमेंटगेटवे’ द्वारेच स्वीकारायची सोय उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. पण सामान्य माणसाला या ऑनलाईन पेमेंटच्या सुविधेचा लाभ हा वेळच्या-वेळी व वेळ वाया न घालवता करता येणार्‍या बिल्सच्या भरण्याच्या सुविधेमुळे होत आहे. ही सुविधा काही बँका ई.सी.एस.च्या (इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस) माध्यमाने आपल्याला उपलब्ध करून देतात. बँकांच्या व्यतिरिक्त ही सुविधा आपल्याला काही बिल भरणार्‍या कंपन्यादेखील ऑनलाईनच उपलब्ध करुन देत आहेत. यात www.billjunction.comwww.billdesk.com या दोन साईटस् बर्‍याच विख्यात आहेत.

या दोन्ही साईट्समध्ये आपल्याला मिळणार्‍या सुविधा या जवळ-जवळ एक सारख्याच आहेत. या साईटच्या उपयोगाने आपण मोबाईल, क्रेडीट कार्ड, विमा, म्युचुअल ङ्गंड, दूरध्वनी, टेलिङ्गोन, वीज, सरकारी कर, गॅस, सामाजिक संस्थांना दान, मासिकं, इत्यादिंची बिलं व शुल्क आपल्या या साईटच्या खात्यातून भरू शकतो. या सार्‍या सेवा पुरविणार्‍या सर्वच अग्रगण्य कंपन्यांबरोबर या साईटने संधान (टाय-अप) साधले आहे. या साईटस् वापरण्यास सोप्या आहेत. त्यांच्या वापराची पध्दत पुढीलप्रमाणे आहे.


  • सर्वात आधी या साईटवर आपल्याला नोंदणी करावी लागते जी आपण मोङ्गतच करू शकतो. या नोंदणीच्या वेळी आपली संपर्क माहिती देखील द्यावी लागते.
  • नोंदणी झाल्यानंतर आपल्याला या साईटकडून आपला ‘स्वागत संच’ (वेलकम किट) पाठविला जातो ज्यात आपल्या खात्याची संपूर्ण माहिती उदा: लॉगीन, पासवर्ड असतो. याचबरोबर आपल्याला ही माहिती ईमेल व एस.एम.एस.द्वारे देखील कळविली जाते. 
  • एकदा का आपले खाते कार्यान्वित झाले की, जी बिल्स आपल्याला या खात्यातून द्यायची असतील त्या बिल्सच्या सेवादात्यांची निवड आपल्याला करायची असते. ही निवड झाल्यावर या साईटस् त्या-त्या कंपन्यांकडून आपल्या नावाची बिलं मागवून घेतात
  • बिलं त्यांच्याकडे आल्यावर या साईटकडून आपल्याला त्याची सूचना एस.एम.एस. व ईमेलद्वारे दिली जाते. ही सूचना मिळाल्यावर आपण साईटवरच्या खात्यात लॉगीन केले की संपूर्ण बिल त्याच्या पूर्ण माहितीसकट आपल्याला बघता येते. हे जरी असले तरी आपल्या सेवादात्याकडून कागदी बिलं देखील आपल्या माहितीसाठी पाठविली जातातच.
  • त्यानंतर बिल भरण्याच्या दोन पध्दती या साईटस् आपल्याला उपलब्ध करून देतात १) आपले कुठचेही बिल भरण्याच्या आधी या साईट्सना आपली परवानगी घ्यावी लागते २) कुठचेही बील आल्यावर या साईटस् आपल्या पूर्व परवानगीनेच ते लगेच भरून टाकतात. या दोन्ही पर्यायांची निवड आपल्याला करायची मुभा असते 
  •  बिल भरण्याची परवानगी आपण साईटला दिली की मग, या साईट आपल्या वतीने आपली बिलं भरतात. आपल्याला पूर्ण बिल भरण्याची जबरदस्तीदेखील या साईटकडून केली जात नाही. आपल्याला हवे असल्यास आपण बिलाचे अर्धे-अर्धे(पार्ट पेमेंट) करू शकतो. 
  •   बिलं भरण्यासाठी एकदा का आपली परवानगी मिळाली की मग या साईटस् हा व्यवहार रिझर्व्ह बँकेत पाठवितात. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे ई.सी.एस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्विस) वापरले जाते व आपल्या बँक खात्यातून पैसे वजा केले जातात. वजा केल्यानंतर देखील आपल्याला तशी सूचना साईटकडून एस.एम.एस. व ईमेलच्या रूपात पाठविली जाते.
  • या सेवेच्या मोबदल्यात आपल्याकडून या साईटस् काही विशिष्ट शुल्क जरी आकारत असल्या तरी मूलत:च हे शुल्क कमी असल्याने त्यांच्या या सेवेच्या मोबदल्यात आपला वाचणारा वेळ व त्रासाचे गणित करता या साईटस् वापरणे नक्की ग्राह्य व योग्य म्हणता येईल.
  • ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला आपले अस्तित्वात असलेलेच बँक खाते वापरता येते, वेगळे खाते उघडण्याची गरज लागत नाही. त्याशिवाय क्रेडिट/डेबिट, अशा कुठल्याही कार्डची देखील गरज नसते
  • साईटकडून आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या खात्यात आपल्या सार्‍या व्यवहारांच्या नोंदींचा विस्तृत अहवाल मिळतो. आपण किती व कुणाची बिलं भरली, कुठची बिलं प्रलंबित आहेत, इत्यादी माहिती या साईटद्वारे उपलब्ध करून दिली जाते.
  • त्याशिवाय आपल्या ६ महिन्यांची बिलं व ३६ महिन्यांच्या बिलांची माहिती आपल्या साईटवरच्या खात्यात साधारणपणे आपल्याला उपलब्ध करून दिलेली असते.
  •  आपले व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी ही साईट सुरक्षेची काळजी घेते. एस.एस.एल., फायरवॉल, इत्यादिच्या सहाय्याने आपले व्यवहार सुरक्षित राखले जातात.
  •  या सुविधेचा लाभ एखाद्या व्यक्तीलाच नव्हे तर एखाद्या आस्थापनाला व संस्थेलादेखील घेता येतो.
  • इंटरनेटच्या व्यतिरिक्त आपल्याला एस.एम.एस.च्या माध्यमाने देखील बिलं भरता येतात. ही प्रक्रियादेखील ऑनलाईन पेमेंटशी बरीचशी मिळती जुळतीच आहे.
इंटरनेटची उत्क्रांती झपाट्याने ‘मोकळ्या वेळेतील टाईमपासचे माध्यम’ ते पार व्यवहार, शिक्षण, संरक्षण इत्यादिंसाठीचे ‘सर्वव्यापक, सोपे व शक्तिशाली माध्यम’ अशी झाली व होत आहे व त्यात ही निरंतर सुधारणा घडत चालल्या आहेत. इंटरनेट हे सामान्यजनांना सामना कराव्या लागणार्‍या उशीर, उपेक्षा व अन्यायावर ईलाज म्हणून प्रचंड वेगाने आकार घेत आहे. त्याशिवाय सामान्यजनांना त्याचे व्यवहार  करण्यासाठी ही इंटरनेट कमालीची मदत करत आहे. या साईटस् याचे उत्तम उदाहरण ठरू शकेल.


कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

0 comments:

Post a Comment