Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

अंड्याचे पॅटीस

साहित्य:
३ उकडलेली अंडी, ३ उकडलेले बटाटे, ४ पावाचे स्लाईस, पाव चमचा आल्याची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ , तेल, गव्हाचा बारीक रवा किंवा ब्रेड क्रम्स.

कृती:
उकडलेले बटाटे सोलून, कुस्करून घ्यावेत. पावाचे स्लाईस पाण्यात भिजवून घ्यावेत. नंतर स्लाईस घट्ट दाबून त्यातील पाणी काढून टाकावे व बटाट्याच्या मिश्रणात घालावे. त्यात पाव चमचा आल्याची पेस्ट व चवीला मीठ घालावे. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून मळून घ्यावेत. उकडलेली अंडी मधोमध कापून त्यातील पिवळा बलक ओका डीशमध्ये काढून घ्यावा. त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून एकत्र करावे. हे तयार झालेले मिश्रण अंड्याच्या पोकऴ भागात भरून घ्यावे. बटाट्याच्या मिश्रणाची गोळी करून त्याची पारी करावी व त्या पारीमध्ये उकडलेले अंड ठेवावे. पारीचे तोंड बंद ठेवून पॅटीसला गोल आकार द्यावा. ब्रेड क्रम्स किंवा रव्यात पॅटीस घोळवून शॅलो फ्राय करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

0 comments:

Post a Comment