Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

शैक्षणिक संकेतस्थळे


काही दशकांपूर्वी मुले शाळेला पाट्या घेऊन जात असत. त्यावेळेस शिक्षक जे शिकवायचे ते मुलांना पाट्यांवरच लिहून घ्यावं लागायचं कारण त्यावेळेस वह्या व पुस्तके मिळतही नसत व सामान्यांना परवडण्याजोगीही नसत. त्यानंतर वह्या व पुस्तकांचा जमाना आला व पाट्या कालबाह्य झाल्या. वहीला इंग्रजीमध्ये ‘नोटबुक’ म्हणतात हे तर आपल्याला माहीत आहेच. पूर्वी मुलं ज्या वयात वह्या वापरायची त्या वयातील आत्ताच्या शाळकरी मुलांना जर आपण नोटबुकबद्दल विचारलं, तर तुम्ही त्यांना लॅपटॉपबद्दल विचारत आहात असंच वाटेल कारण छोट्या लॅपटॉपला नोटबुक म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात ज्यात शाळा-कॉलेजातील शिक्षणही आता इंटरनेटआधारित होत चालले आहे, आपल्याला म्हणजेच ङ्गक्त सर्व विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांनाही ह्या इंटरनेट व वेबसाईटस्चा शिक्षणात होणारा उपयोग जाणून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते

www.mycbseguide.com http://www.excellup.com/, http://nptel.ac.in/, www.upscportal.com, www.gjtutorial.com  ह्या अशाच काही वेबसाइटस् ज्या आपल्याला ‘मोङ्गत’ वापरायला मिळतात. ह्या विविध साइटसचा उपयोग सीबीएसई बोर्डाच्या ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना तसेच, आयआयटी-जेईई, एआयईईई, बीआयटीएसएटी, सीईटी-के, ईएएमसीईटी, एमएचटी-सीईटी, जीएटीई, वीआयटीईईई या अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या परीक्षार्थी व एआयआयएमएस, एआयपीएमटी, सीओएमईडीके, सीईटी-के, एमएचटी-सीईटी, इएएमसीईटीई जीयूजी-सीईटी या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या परीक्षार्थी. शिवाय सीएटी, एक्सएटी, एसएनएपी, एमएटी, एमएएच-सीईटी, आयबीएसएटी, एफएमएस, आयआयएङ्गटी, एनएमईटी, जेएमईटी या व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना?आणि जीआरई, जीएमएटी, टीओईएङ्गएल, आयईएलटीएस, एसएटी, एलएसएटी, यूएसएमएलई, या परदेशात शिक्षण घेण्यासाठी असणार्‍या प्रवेश परीक्षांच्या परीक्षार्थींना भरपूर फायदा होऊ शकतो. त्याशिवाय भारतीय लोक सेवा आयोग (यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लीक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा, उदा: सीडीएस, सीएसई, आयईएस, आयएङ्गसी, एनटीए/एनए) व सर्व बँकांच्या व सरकारी संस्था व आस्थापनांच्या प्रवेश परीक्षांच्या परीक्षार्थींनाही ह्यातील काही साइट्सचा भरपूर फायदा होऊ शकतो.

सीबीएसई बोर्डाच्या शिक्षण अभ्यासक्रमासाठी...
www.mycbseguide.comhttp://www.excellup.com/ या साइट्स सीबीएसई बोर्डाच्या ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगाच्या आहेत. mycbseguide साइटवर दर वर्षीचा ९ वी ते १२ वी चा प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयाचा अधिकृत अभ्यासक्रम (सिलॅबस) अपलोड (प्रकाशित) केलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा काही वेळेस होणारा अभ्यासक्रमाबद्दलचा गोंधळ कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर mycbseguidehttp://www.excellup.com/ या साईटस्वर ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी निगडित नोट्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय नियमित गृहपाठासाठी http://www.excellup.com/ वर असाइनमेंटसही उपलब्ध आहेत mycbseguide वर महत्त्वाच्या प्रश्‍नांचा संचयही आहे. आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो ते आपल्याला लवकर लक्षात येते. म्हणूनच http://www.excellup.com/ वर समजण्यासाठी जटील अशा विषयांच्या चित्रफिती उदाहरणार्थ: हृदय क्रिया, पचन प्रणाली, व्हर्निअर कॉलिपर्सचा वापर, प्रकाश संश्‍लेषण (फोटोसिंथेसीस), इत्यादीवरील चित्रफिती उपलब्ध आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे www.mycbseguide.comhttp://www.excellup.com/ या दोन्ही साइट्सवर प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयांच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकांचे नमुने व मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिकाही उपलब्ध आहेत ज्या आपण डाऊनलोड करू शकतो.
शिवाय शाळांशी निगडित बातम्या, सामान्य ज्ञानाच्या चाचण्या, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याच्या युक्त्या, परीक्षांचे निकाल, विविध व्यवसायांबद्दल व नोकर्‍यांबद्दलची माहिती (करिअरच्या पर्यायांची माहिती) ह्या साइट्सवर आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय ङ्गक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्या कडून नियमित मोङ्गत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व दाखल्यांच्या (ऍडमिशनच्या) आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींची सूचना व माहिती असते.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि परदेशी शिक्षण अभ्यासक्रमासाठी
www.minglebox.com ही ह्या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी सर्वात उपयुक्त साईट आहे. minglebox वर भारतातील ५००० शैक्षणिक संस्थांची यादी त्यांचे इतिवृत्त(प्रोफाईल), तेथे उपलब्ध असणार्‍या सुविधा, तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम व ते शिकविणार्‍या प्राध्यापकांची माहिती, तेथील नोकरभरतीची  माहिती, शेवटच्या तुकडीतील विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त पगार(पॅकेज) मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची नाव व त्याचे पॅकेज व ते पॅकेज देणार्‍या कंपनीचे नाव, त्या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्या संस्थेबद्दलची मते, त्या संस्थेच्या आवाराची (कॅपसची) छायाचित्रे व व्हिडिओज् त्या संस्थांचा गुणानुक्रम इत्यादी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे minglebox वर आपल्याला या सर्व अभ्यासक्रमांच्या नमुना परीक्षा  देता येतात. त्यामुळे परीक्षांची रंगीत तालीम करण्याचे ही अत्यंत उपयुक्त साधन आहे. ह्या मॉक टेस्टस्मध्ये आपण आपल्याला सोडविता न आलेल्या प्रश्‍नांना बुकमार्क करू शकतो. ज्यामुळे आपल्याला त्या प्रश्‍नांचा परीक्षा संपल्यानंतरही विशेष अभ्यास करता येतो minglebox वर प्रत्येक अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत नोटस् उपलब्ध आहेत ज्या आपण डाऊनलोड करू शकतो. शिवाय या साईटवर शिक्षण तज्ञांच्या प्रोङ्गाईलस् असतात. त्या बघून आपण त्यातील तज्ञांची निवड करून त्यांच्याशी व येथील इतर नेटकरांबरोबर विचार-विनिमय (ङ्गोरम डिस्कशन) करू शकतो. ह्याच तज्ञांकडून आपल्याला ह्या परीक्षांच्या वेळेला होणार्‍या मुलाखत व सांघिक चर्चा (ग्रुप डिस्कशन) बद्दल मार्गदर्शनही मिळू शकते.
त्याशिवाय ङ्गक्त आपले नाव व ई-मेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्याकडून नियमित मोङ्गत समाचारपत्र  पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व दाखल्यांच्या आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींच्या सूचना व माहिती असते. www.minglebox.com वर आपल्याला ह्या सर्व परीक्षांचे निकाल ही थेट कळतात. इतर पदवी परीक्षांपैकी विज्ञान, वाणिज्य व कला या शाखांमधील वैमानिकशास्त्र, जीवतंत्रशास्त्र (बायोटेक्नोलॉजी), वैद्यकीय संशोधन, बीसीए/एमसीए, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, बीबीए/बीबीएम, हॉटेल व्यवस्थापन, बँका व अर्थशास्त्र, प्रसारमाध्यम, रिटेल, प्रवास व्यवस्थापन, कॉल सेंटर प्रशिक्षण, ऍनिमेशन, फैशन डिझाइन व इतर बाह्य शिक्षण अभ्यासक्रम शिकविणार्‍या संस्था व विद्यापीठांची नावं, पत्ते, संपर्क व त्या संस्थेबद्दलचा इतिवृत्त minglebox वर आपल्याला मिळतो.

http://nptel.ac.in/ या साईटवर आपल्याला १० विषयांमधील उदा- स्थापत्यशास्त्र (सिव्हिल इंजिनिअरींग), संगणकशास्त्र, विद्युतशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व संपर्कशास्त्र, यांत्रिकशास्त्र (मेकॅनिकल इंजिनिअरींग), समुद्रशास्त्र, खाणकाम व धातुशास्त्र (मायनिंग आणि मेटालर्जी) जीवतंत्रशास्त्र (बायोटेक्नोलॉजी) इत्यादि मधील जवळ-जवळ ३५ उप-विषयांचे व्हिडिओज् उपलब्ध आहेत ज्यात आयआयटी च्या प्राध्यापकांचे शिकवणी वर्ग (लेक्चर्स) व उदाहरणांसहित स्पष्टीकरणं आहेत.

0 comments:

Post a Comment